स्थिर उभे राहा

13परंतु प्रभूला प्रिय असलेल्या बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमच्यासाठी परमेश्वराची सतत उपकारस्तुती केली पाहिजे, कारण परमेश्वराने तुम्हाला आत्म्याद्वारे होणार्‍या पवित्रीकरणाच्या कार्यात व सत्यावरील विश्वासात प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे. 14आमच्या शुभवार्तेद्वारे त्यांनी तुम्हाला यासाठी पाचारण केले की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवात तुम्ही सहभागी व्हावे.

15बंधू आणि भगिनींनो, स्थिर राहा आणि जे शिक्षण आम्ही तुम्हाला शब्दाद्वारे किंवा पत्राद्वारे सोपवून दिले त्याला घट्ट धरून ठेवा.

16ज्यांनी कृपेद्वारे आपल्यावर प्रीती केली आणि युगानुयुगाचे प्रोत्साहन व चांगली आशा आपल्याला दिली, ते परमेश्वर आपले पिता व स्वतः आपले प्रभू येशू ख्रिस्त, 17तुमच्या अंतःकरणास प्रोत्साहित करोत आणि प्रत्येक चांगल्या कृतीत आणि बोलण्यात तुम्हाला समर्थ करोत.