नियमशास्त्राची परिपूर्ती
17“मी मोशेचे नियमशास्त्र व संदेष्ट्यांची भाकिते रद्द करण्यासाठी नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी आलो आहे. 18मी तुम्हाला सत्य सांगतो की आकाश व पृथ्वी नाहीतशी होतील तोपर्यंत, आणि सर्वगोष्टी पूर्ण होईपर्यंत नियमशास्त्रातील एकही शब्द अथवा कानामात्रा कशानेही नाहीसा होणार नाही. 19जो कोणी नियमशास्त्रातील लहान आज्ञा मोडेल आणि दुसर्यांनाही त्यानुसार शिकविल, तो स्वर्गाच्या राज्यात कनिष्ठ गणला जाईल. परंतु जे परमेश्वराचे नियम शिकवितात आणि पाळतात ते परमेश्वराच्या राज्यात श्रेष्ठ ठरतील. 20कारण मी तुम्हाला सांगतो की, परूशी आणि इतर नियमशास्त्र शिक्षक यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक असल्याशिवाय, तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात कधीही प्रवेश मिळणार नाही.


