मोहरी व खमिराचा दाखला
31येशूंनी त्यांना आणखी एक दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, जो एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. 32तो सर्व दाण्यापैकी सर्वात लहान असला तरी जेव्हा ते वाढते तेव्हा ते बागेतील सर्वात मोठे झाड होते, मग त्याच्या फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी येऊन विसावा घेतात.”
33त्यांनी त्यांना आणखी एक दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य त्या खमिरासारखे आहे, जे एका स्त्रीने ते घेतले आणि तीन माप पिठात एकत्र केले की त्यामुळे सर्व पीठ फुगले.”
34या सर्वगोष्टी येशू गर्दीतील लोकांशी दाखल्यांद्वारे बोलले; आणि ते दाखल्यांवाचून त्यांच्याशी काहीच बोलले नाही. 35याप्रमाणे संदेष्ट्यांद्वारे जे भविष्य सांगितले होते ते पूर्ण झाले ते हे:
“मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन.
जगाच्या उत्पत्तीपासून ठेवलेले रहस्य मी त्यांना सांगेन.”


