ईचार न करता बोलानं धोकादायक
1जवय तु देवना मंदिरमा जास तवय आपली वागनुककडे ध्यान दे; तठे ऐकाले जाय. ऐकी लेवानं हाई मुर्खना यज्ञपेक्षा चांगल शे; जीवनमा त्या वाईट करतस हाई त्या वळखतस नही. 2तुना तोंडघाई बोलानी घाई करु नको, अनी देवनासमोर कोनतीबी गोष्ट उच्चार कराले उतावळा करानं नही, कारण देव स्वर्गमा शे अनी तु पृथ्वीवर शे, म्हनीसन तुना शब्द मोजकाच राहावाले पाहिजे. 3जर तुमले बऱ्याच गोष्टी करन्या व्हतीन तर तुम्हीन त्याईषयी काळजी करतस, अनी तुमले बराचदाव वाईट सपन पडतस, अनी तुम्हीन बराच बोलतस, अनी बहुतेक करीसन बऱ्याच मुर्ख गोष्टी बोलतस. 4जर तु देवले नवस करं व्हई तर ते फेडाले येळ लावू नको; कारण देव मुर्खसवर प्रसन्न व्हस नही. जे नवस तु करेल शे त्यानी फेड कर. 5नवस करानं अनी तो फेडानं नही त्यानापेक्षा ते नही करेल बरं शे. 6आपला तोंडमुये आपला शरीरले शिक्षा व्हवु देऊ नको, मी चुकीसन बोलनू अश देवनादूतनासमोर बोलू नको; तुना बोलानं राग ईसन देवना क्रोध तुनावर काबर येवाले पाहिजे, तुना हातना काम त्यानी काबर नष्ट करान? 7कारण बराच स्वप्न दखनं अनं बराच भाषण करानं ह्या वायफळ गोष्टी शेतस, पण तु देवना भय धरीन ऱ्हाय.


